Advertisement

ट्रॅक्टर-पिकअपचा भीषण अपघात

प्रजापत्र | Thursday, 17/02/2022
बातमी शेअर करा

गेवराई :  वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर मुलीसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन शनीचे रोडवर बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भिषण होता की, यामध्ये राक्षसभुवन येथील चंद्रशेखर शामराज पाठक ( वय वर्ष ३९ ) व त्यांचा मुलगा आर्यन ( वय १२ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मंजरी चंद्रशेखर पाठक ( वय ११ ) हिच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनाच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई घटनास्थळी धाव घेतली होती.

Advertisement

Advertisement