गेवराई - चार मुलासह आईची विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे गुरुवार रोजी रात्री घडली असून सरत्या वर्षाच्या सकाळी शुक्रवारी रोजी सकाळी नऊ वाजता हि घटना उघडकीस आली. दरम्यान आपल्या चार मुलांसह 30 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली असून मृतांत एक मुलगा तीन मुलींचा समावेश आहे.
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव शिवारातील गट नंबर ९३ मधील फिसके नामक शेतकऱ्याच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले असून मृता मध्ये गंगासागर ज्ञानेश्वर आडाणी (वय ३० वर्ष),भक्ती ज्ञानेश्वर आडाणी (वय १२ वर्ष), ईश्वरी ज्ञानेश्वर आडाणी (वय १० वर्ष), अक्षरा ज्ञानेश्वर आडाणी (वय ८ वर्ष), युवराज ज्ञानेश्वर आडाणी (वय ६ वर्ष), असे या मृतांचे नावे आहेत.
आज सकाळी ९ वाजता या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि शितलकुमार बल्लाळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विहीरितून मृतदेह बाहेर काढले. तसेच पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. दरम्यान या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
कालपासून महिला होती बेपत्ता…
काल दुपारपासून ही महिला घरातून बेपत्ता झाली होती. यानंतर पती व नातेवाईकांनी तिचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र ती कुठेच आढळून आली नाही. दरम्यान आज सकाळी शोधाशोध सुरू असताना गावाजवळील फिसके नामक शेतकरी यांच्या विहिरीत हे पाच ही मृतदेह आढळून आले. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.