Advertisement

शौचास गेलेल्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 30/11/2021
बातमी शेअर करा

गेवराई : सकाळी शौचास गेलेल्या तरुणाचा उघड्या रोहित्रावरील ताराला धक्का लागला. यामध्ये विजेचा तिव्र धक्का लागल्याने सदरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील सावरगाव येथे घडली. दत्तू आण्णाभाऊ जाधवर (वय २० वर्ष) असे या मयत तरुणांचे नाव आहे.

 

 

सावरगाव येथील दत्तू जाधवर हा सकाळी उठल्यावर रोजच्या प्रमाणे शौचास गेला होता. यावेळी त्याचा उघड्या रोहित्रावरील ताराला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा तिव्र धक्का बसला. यामध्ये दत्तूचा जागीच मृत्यू झाला. हि घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला असुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मादळमोही प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement