गेवराई-तालुक्यातील सुरळेगाव येथून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक होत असल्याची माहिती महसुल प्रशासनाला मिळताच तहसिलदार सचिन खाडे यांनी महसुल पथकाला सोबत घेऊन धडक कारवाई करत एकूण 18 लाख रूपयांचा मुद्देमाल केला आहे.
तालुक्यातील सुरळेगाव येथील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांना मिळताच त्यांनी शनिवार दि.20 रोजी सकाळी महसूल पथकाला सोबत घेत सुरळेगाव येथे पा टाकला असता त्या ठिकाणी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर निदर्शनास आले त्यांनी सदरील दोन्ही
ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून यात अंदाजे 18 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले असून, ही कारवाई तहसीलदार सचिन खडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल अव्वल कारकून बळीराम राठोड, तलाठी पवार, अमित , किरण, श्रीकृष्ण चव्हाण आदींनी केली. दोन दिवसापूर्वी चकलंबा पोलीसांनी राकक्षसभुवन या ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर तहसीलदार व त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.