Advertisement

दोन गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपींसह मोटर सायकल चोर गजाआड

प्रजापत्र | Sunday, 31/10/2021
बातमी शेअर करा

गेवराई दि.३१ – शहरातील एका चौकात एक इसम कंबरेला गावठी पिस्टल घेऊन उभा असल्याची माहिती मिळल्यावरून त्यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ गावठी कट्टा व जिवंत काडतुस सापडल्याची घटना घडली आहे. तर एकास मोटारसायकल चोरी प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

              दिनांक 30/10/2021 रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार बीड जिल्हा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीष वाघ यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हॉटेल साई प्रसाद शिवाजी चौक, गेवराई येथे वैजिनाथ भाऊसाहेब थोरे रा. शिवाजीनगर, गेवराई नावाचा इसम उभा असुन तो विनापरवाना बेकायदेशीर रित्या त्याचे कंबरेला गावठी पिस्टल लावुन थांबलेला आहे. माहितीच्या आधारे स्थागुशा चे अधीकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी पाठुन त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडुन एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करुन पो.स्टे. गेवराई येथे गुरनं 496/2021 कलम – 3 / 25 भारतीय हत्यार कायदयाप्रामणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच पो.स्टे. बीड शहर येथे इसम नामे विजय सखाराम गायकवाड रा. माळापुरी यांच्याकडुन एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त करुन पोस्टे बीड शहर गुरनं 208/2021 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

             सदर कारवाई दरम्यान सरकारी दवाखाना, बीड समोरुन मोटर सायकल चोरी करणारा संशयित इसम शेख अमीर शेख समीयोदीन रा. झमझम कॉलनी, बीड यास ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता त्यांने सांगितले की, मी सरकारी दवाखाना, बीड येथुन तीन मोटर सायकल चोरी केल्या आहे. असे सांगितल्यावरुन त्याच्याकडुन 03 मोटर सायकल किंमत 1,30,000 रु चा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. बीड शहर येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहे. सदरची कामगीरी वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अमलदारांनी केली.

Advertisement

Advertisement