गेवराई : भ्रष्टाचार विरोधी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी गेवराईत येथील आगार व्यवस्थापक वाघदरीकर यास पंधरा हजार रुपयांची लाच घेतानाअटक करण्यात आले. ही कारवाई मंगळवार ता. 26 रोजी औरंगाबाद लाचलुचपतप्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. या घटनेने सर्वत्र घटनेने खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या औरंगाबाद कार्यालयाकडे गेवराईच्या डेपो मॅनेजरने लाच मागितल्याची तक्रार आली होती. त्यानुसार एसीबीने रचलेल्या सापळ्यात बसस्थानकासमोरच गेवराईचा आगार प्रमुख अडकला आहे. त्याने तक्रारदाराला, तुझा स्टोअरचा रिपोर्ट करणार नाही पण त्यासाठी तीस हजार रुपयाची लाच मागीतली होती.पण १५ हजार रुपये घेताना त्याला अटक करण्यात आले. सदरची कार्यवाई औंरगाबाद परिक्षेत्रातील सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक संदिप राजपुत , राजेंद्र जोशी , मिंलिंद ईप्पर , एवलसिंग हुसुंगे यांनी केली आहे .