Advertisement

एसटी प्रवास महागणार:एसटी महामंडळाने 17% दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला

प्रजापत्र | Monday, 25/10/2021
बातमी शेअर करा

एसटी महामंडळाने १७%भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून येत्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी व्यक्त केली आहे. इंधन दरवाढ, नियमित उत्पन्नातील घट, त्यात कोरोना काळातील आर्थिक फटक्यामुळे महामंडळाला दुरुस्ती-देखभालीसह कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अडचण येत आहे. यावर उपाय म्हणून ही भाडेवाढ सूचवण्यात आली.

महामंडळाने जून २०१८ मध्ये भाडेवाढ केली होती. त्यानंतर तीन वर्षे चार महिन्यांनंतर आॅक्टोबर २०२१ मध्ये ही वाढ होणार आहे. ही वाढ करताना हकीम समितीच्या शिफारशींचा अभ्यास करून प्रस्ताव तयार केला आहे. २०१८ मध्ये करण्यात आलेली भाडेवाढ यांचाही तुलनात्मक अभ्यास करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी महामंडळाला चार हजार कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कोरोना काळातील दीड वर्षात हा तोटा तीन हजार कोटींपेक्षा जास्त झाला. आतापर्यंत एसटी महामंडळाला १२ हजार ५०० रुपये कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

जुलै २०२१ मध्ये डिझेल ९१.७० पैसे प्रतिलिटर होते. त्यामुळे डिझेलसाठी महामंडळावर ७२ कोटी रुपयांचा जास्तीचा भार पडला होता. आता डिझेलने शंभरी पार केल्याने महामंडळावर ८१ कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा भार पडत आहे.

Advertisement

Advertisement