मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिलेल्या राजिनाम्यानंतर तब्बल 20 महिन्यांनी राज्य महिला आयोगावर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.
रुपाली चाकणकर यांची महिला आयोगावर वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. बुधवारी राज्य सरकारने या संदर्भातचे अधिकृत आदेश काढले आहेत. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे. विजया रहाटकर यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये राजिनामा दिल्यापासून महिला आयोगाच्या अध्यक्षाचे पद रिक्त होते. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना महिला आयोगाला अध्यक्ष नसल्याबद्दल विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टिका होत होती. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना हे पद मिळाले आहे.
बातमी शेअर करा