Advertisement

आवरगाव पाठोपाठ नागपुरात रात्रभर गूढ आवाज

प्रजापत्र | Sunday, 03/10/2021
बातमी शेअर करा

किरण धोंड 
परळी-धारूर तालुक्यातील आवरगावमध्ये सलग तीन दिवस गूढ आवाज आल्यानंतर आता परळी तालुक्यातील नागापुरात शनिवारी पूर्ण रात्रभर गूढ आवाज आल्याने ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.नागापुरमध्ये  भुवैद्यानिकानी गावात पहाणी करत ग्रामस्थांना धीर देण्याचे रविवारी सकाळी काम केले.
           परळी तालुक्यातील लाडझरी नागदरा गावात ही यापुर्वी भुकंपा सारखा आवाज येत असल्याने प्रशासनाने यावर काम करणाऱ्या भुवैद्यानिकाची टिम पाचारण करुन याबाबत अभ्यासाअंती स्पष्ट केले आहे की,हा आवाज भुकंपाचा नसून कोणीही घाबरण्याचे कारण नाही.नांदेड,हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत मराठवाड्यात किंवा परळी तालुक्यात भुकंपाची कुठलीही नोंद देखील नसून जास्त पावसामुळे जमिनीमधील जी पोकळी आहे. त्यामध्ये पाणी गेल्याने त्यातील हवा बाहेर आल्यामुळे हा आवाज आले. हा भूकंपाचा काही प्रकार नाही असे या तज्ञानी यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement