अविनाश इंगावले
गेवराई-राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी जवळ एका ओढ्यात मानवी सांगडा आढळून आल्याने खळबळी उडाली.रविवारी (दि.३) गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हा सांगडा महिलेचा असल्याचा अंदाज पोलीस जमादार ए.बी.शेळके यांनी वर्तविला आहे.गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ही सध्या घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रांजणी गावाजवळ एका ओढ्यात मानवी सांगडा आढळून आल्यानंतर गेवराई पोलिसांनी याची माहिती देण्यात आली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. साधारण आठ ते दहा दिवसापूर्वी महिलेचा खून करून मृतदेह इथे लपविण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.सध्या पोलीस जमादार ए.बी.शेळके हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
बातमी शेअर करा