Advertisement

किर्तन सुरु असतानाच ताजोद्दीन महाराज यांनी देह ठेवला…

प्रजापत्र | Tuesday, 28/09/2021
बातमी शेअर करा

नंदुरबार : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे रात्री नंदुरबार जवळील जामोद या गावी किर्तन चालू असताना दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सांप्रदाय क्षेत्रात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
ताजोद्दीन महाराज हे मुस्लिम समाजातील असताना देखील त्यांनी सांप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन समाज प्रबोधन केले होते. ताजोद्दीन महाराज यांचा शिवचरीत्रावर गाढा अभ्यास होता, त्यांनी आपल्या किर्तनातून शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरीत्रावर नेहमीच प्रकाश टाकलेला आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात त्यांचे जामोद या गावी सोमवारी किर्तन होते. याठिकाणी किर्तनात त्यांनी आपला देह ठेवला. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली असून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या महान तपस्वी भगवंतभक्त ताजोद्दीन महाराज यांना प्रजापत्र परिवारातर्फे भावपुर्ण श्रध्दांजली.

Advertisement

Advertisement