मुंबई: राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असं भाजपाच्या काही नेत्यांचं प्राथमिक मत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
बातमी शेअर करा