Advertisement

डिझेलचे दर पुन्हा वाढले

प्रजापत्र | Friday, 24/09/2021
बातमी शेअर करा

देशात डिझेलच्या दरांत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शुक्रवार (दि . २४ ) सप्टेंबर २०२१ रोजी दोन महिन्यांहून अधिक काळानं देशात डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. आज ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, डिझेलच्या किमतीत २० ते २२ पैशांची वाढ करण्यात आली आहे. अशातच पेट्रोलचे दर  मात्र स्थिर आहेत. मुंबईत डिझेलची किंमत दरवाढीनंतर  ९६.१९  रुपये प्रति लिटरवरुन ९६.४१ रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये प्रति लिटरवरुन 88.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. 

 

 

दरम्यान, यापूर्वी १५ जुलै २०२१ रोजी डिझेलच्या दरांत वाढ झाली होती. तेव्हा पेट्रोल १५ पैशांनी महागलं होतं. परंतु, त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ झालेली नव्हती. तसेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंधनाच्या दरांत काही प्रमाणात घट झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. 

 

 

देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, देशातील प्रमुख महानगरांपैकी सर्वाधिक दर मुंबईत आहेत. देशाच्या राजधानीच्या शहरात पेट्रोलच्या किमती १०१.१९ रुपये आणि डिझेलच्या किमती ८८.८२ रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या आहेत. तर मुंबईत पेट्रोलच्या किमती १०७.२६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती ९६.४१ रुपये प्रति लिटरवर पोहोचल्या आहेत. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलच्या किमती १०१.६२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती ९१.९२ रुपये प्रति लिटर इतक्या आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमती ९८.९६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती ९३.४६ रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशातील चार महानगरांची तुलना केली, तर पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. 

 

Advertisement

Advertisement