औरंगाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांचा अभिवादन केल्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी. आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो,
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना या वक्तव्याचा अर्थ विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, "याचा अर्थ तोच आहे. व्यासपीठावर सगळे माझे आजी, माझी सहकारी उपस्थित होते आणि उद्या सगळे एकत्र आले तर भावीपण होऊ शकतात."
सगळे कोण असं विचारल्यावर ते म्हणाले, सगळे येतील तेव्हा कळेल. येणारा काळच ते ठरवेल.
बातमी शेअर करा