बीड : बेकायदा गर्भपात प्रकरणात शिक्षा झालेल्या आणि सध्या जामिनावर असलेल्या सुदाम मुंडेंने परळी तालुक्यात पुन्हा बेकायदा दवाखाना थाटला , त्यावर शनिवारी मध्यरात्री कारवाई देखील झाली, मात्र सुदाम मुंडेंचे हे बिंग फुटले कसे ? या दवाखान्याची माहिती प्रशासनाला झाली कशी हे देखील तितकेच रंजक आहे. तब्बल एक महिन्यापासून प्रशासनाला या प्रकरणाची कुणकुण होती, आणि प्रशासनाच्या पातळीवर याची माहिती घेतली जात होती.
हे हि वाचा :
काय आहे सुदाम मुंडे प्रकरण ?
http://prajapatra.com/302
सुदाम मुंडेला विजयमाला पाटेकर या महिलेचा बेकायदा गर्भपात आणि तिच्या मृत्यू प्रकरणात १० वर्षाची शिक्षा झाली होती, मात्र काही महिन्यांपूर्वी त्याची जमिनीवर सुटका झाली. त्याचा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना रद्द करण्यात आला होता , तरीही त्याने परळी तालुक्याच्या ग्रामीण भागात दवाखाना सुरु केला. या ठिकाणी त्याने अगदी संभाव्य कोरोना रुग्णांवर देखील उपचार सुरु केले होते अशी माहिती आहे.
हे हि वाचा :
सुदाम मुंडेंच्या दवाखान्यात सापडलं काय ?
http://prajapatra.com/303
ग्रामीण भागातच सुदाम मुंडेंने उपचार सुरु केले होते. मात्र सुदाम मुंडेंकडे उपचार घेतलेल्या सुमारे तीन रुग्णांचा पुढे उपचारादरम्यान औरंगाबाद आणि इतर ठिकाणी मृत्यू झाल्याची क्चरचा आहे. यातील काही रुग्णांच्या नातेवाईकांनी याची माहिती आ. संजय दौंड यांना दिली. आ. संजय दौंड यांनी लगेच जिल्हाधिकारी , जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना याची कंपन दिली. गर्भपातासोबतच सुदाम मुंडे संभाव्य कोरोना रुग्णांवर देखील उपचार करत असल्याने यामुळे संसर्ग फैलावण्याचा धोका देखील त्यांनी प्रशासनाला बोलून दाखवला.
सुरुवातीला यावर कारवाई कोणी करायची? जिल्हा शल्य चिकित्सक का जिल्हा आरोग्य अधिकारी यावरून प्रशासनात खल झाला. त्यानंतर प्रशासनाने माहिती जमा करणे सुरु केले. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी यात निर्देश देत माहिती जमविली , या संदर्भात 'वरिष्ठांना ' देखील कळविण्यात आले आणि शनिवारी मध्यरात्री 'सर्जिकल स्ट्राईक ' करण्याचा निर्णय झाला . त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्यांची टीम परळीत दाखल झाली आणि ही कारवाई झाली. दरम्यान या कारवाईच्या २-३ दिवस अगोदर देखील स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक परळीत तळ ठोकून माहिती घेत होते.