बीडः परळी तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या सुदाम मुंडेच्या बेकायदा दवाखान्यावर छापा मारण्यात आल्यानंतर या ठिकाणी जे काही सापडले त्यामुळे तपासणी करणारे देखील चक्रावले आहेत.
परळी तालुक्याच्या ग्रामीण भागात सुदाम मुंडेने बेकायदा दवाखाना थाटला होता. सुदाम मुंडेवर बेकायदा गर्भपात प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र वैद्यक परिषदेने (एमसीआय ) त्याची नोंदणी २०१५ मध्ये रद्द केली होती. त्यामुळे सुदाम मुंडेकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कोणताही परवाना नाही.
काय आहे सुदाम मुंडे प्रकरण?
http://prajapatra.com/302
तरिही सुदाम मुंडेने ग्रामीण भागात दवाखाना थाटला होता. तेथे अद्ययावत सुविधा सुरु ठेवल्या होत्या. एक्सरे मशीन आणि अगदी आँक्सीजन बेड ची सोय करण्यात आली होती. मोठ्याप्रमाणात आक्षेपार्ह औषधे देखील तपासणी दरम्यान सापडली. तपासणीच्या वेळी दोन रुग्ण आँक्सीजनवर होते. त्यांना तपासणी करणाऱ्या पथकाने तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलवले आहे. सुदाम मुंडेने चक्क कोरोना संशयितांवर उपचार केल्याचा संशय आहे.
                                    
                                
                                
                              
