टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहेत. भारताच्या आणखी एका खेळाडूने भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. भारताच्या अवनी लेखराने सोमवारी येथे टोक्यो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले आहे. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २२९.१ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.
याआधी अवनी लेखरा पात्रता फेरीत एकूण ६२१.७ गुणांसह सातव्या स्थानावर होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने २४९.६ गुण मिळवत सुवर्ण पटकावले.अवनीला अंतिम फेरीमध्ये चीनची नेमबाजाने कडवी लढत दिली होती. पण नंतर अवनीने अचूक लक्ष साधत तिचा पराभव केला. चीनची महिला नेमबाज झांगने २४८.९ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आणि रौप्य पदक पटकावले.
अवनी लेखरा ११ वर्षांची असताना, तिचा अपघातात झाला होता. या अपघातात तिला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, ज्यामुळे तिला अर्धांगवायू झाली. जयपूर, राजस्थानची येथे राहणारी, अवनीची महिलांच्या १० मीटर एअर स्टँडिंग शूटिंगच्या एसएच१ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानावर आहे. अवनीला तिच्या वडिलांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी प्रोत्साहित केले होते. अवनीने नेमबाजी आणि तिरंदाजी या दोन्हीमध्ये खेळांमध्ये रस दाखवला होता. पण शेवटी तिने नेमबाजीमध्ये कारकीर्द घडवण्याचे ठरवले.
दरम्यान, टोक्यो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील रविवारचा दिवस भारतासाठी तिहेरी पदककमाईचा ठरला. यामध्ये दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. पण तिने ऐतिहासिक रौप्यपदकावर मोहोर उमटवली. उंच उडीपटू निशाद कुमारने २.०६ मीटर अंतरावर झेप घेत रौप्यपदक कमावले. तर थाळीफेकपटू विनोद कुमारने कांस्यपदक जिंकले.