Advertisement

 मोठी बातमी! १२ ते १७ वयोगटातील मुलांना मिळणार लस

प्रजापत्र | Thursday, 26/08/2021
बातमी शेअर करा

 

 

नवी दिल्लीः केंद्र सरकारने DNA वर आधारीत जगातील पहिल्या Zycov-D या जायडस कॅडिलाच्या करोनावरील लसीला काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली. ही लस १२ वर्षांवरील मुलांसाठी विकसित करण्यात आली आहे. पण ही लस कधीपासून मुलांना दिली जाणार हे, स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. आता NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा ( National Technical Advisory Group on Immunisation ) यांनी याबाबत स्पष्टता आणली आहे. येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना करोनावरील Zycov-D ही लस दिली जाईल, असं अरोरा यांनी सांगिलं. तीन डोस असलेली ही लस आहे.

काय म्हणाले अरोरा?

येत्या ऑक्टोबरपासून लहान मुलांना करोनावरील लस दिली जाईल. गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार केली जाईल. सर्वप्रथम प्राधान्याने या मुलांना ही लस दिली जाईल, असं अरोरा यांनी सांगितलं. राज्य सरकारांनी मुलांच्या बौद्धीक विकासासाठी प्राथमिक शाळा सुरू कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी राज्यांनी तयार करावी. यामुळे या मुलांना सर्वात आधी लस मिळू शकेल. Zycov D लस देण्याच्या आधी ही यादी जाहीर केली जाईल. या यादीच्या आधारावर १२ ते १७ ऑक्टोबरदरम्यान गंभीर आजार असलेल्या मुलांना लस देण्यास सुरुवात केली जाईल, असं अरोरा यांनी सांगितलं.

 

 

गंभीर आजार असलेल्या मुलांना आधी लस

देशात १२ ते १७ वर्षांदरम्यानच्या मुलांची एकूण संख्या ही १२ कोटी आहे. तंदुरुस्त मुलांमध्ये करोनाने गंभीर आजार किंवा मृत्युची शक्यता खूप कमी असते किंवा नसतेच. सरकारला चिंता फक्त गंभीर आजार असलेल्या मुलांची आहे. यामुळे गंभीर आजार असलेल्या लहान मुलांना करोनाची लस सर्वात आधी दिली जाणार आहे.

जायडस कॅडिलाच्या ZyCoV-D या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर देशात आता करोनावरील एकूण ६ लस उपलब्ध झाल्या आहेत. ZyCoV-D च्या लसीचे दरवर्षी १०० दशलक्ष ते १२० दशलक्ष डोस तयार करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने लसीचा साठाही सुरू केला आहे. ZyCoV-D लसीसाठी कंपनीने १ जुलैला मंजुरीसाठी अर्ज केला होता. या लसीची २८,००० हून अधिक व्हॉलेंटियर्सवर चाचणी करण्यात आली आहे. ही लस ६६.६ टक्के प्रभावी आहे.

 

 

 

Advertisement

Advertisement