गेवराई दि. २३ ( वार्ताहार ) शहरातील रहिवासी असलेले वकील अॅड. सोपान मडके यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. सदरील बांधकामांचे काम मला का दिले नाही म्हणत मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन पळवल्याची घटना आहे .
सविस्तर माहिती अशी कि गणेश नगर भागातील रहिवासी असलेले अॅड सोपान मडके यांच्या घराचे बांधकामाचे काम मला का ? दिले नाही म्हणुन वकीलाच्या घरात घुसून लाकडी दांड्याने मारहाण केली व गळ्यातील सोन्याची चैन पळवत ३५ हजाराचा ऐवज लंपास केला असल्याची पोलिसांमध्ये फिर्याद अॅड. सोपान मडके यांनी देऊन आरोपी शेख मोईन शेख राजू व अन्य अनओळखी तिघांविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत .
बातमी शेअर करा