Advertisement

वकीलाला मारहान करूण गळ्यातील सोन्याची चैन पळवली

प्रजापत्र | Monday, 23/08/2021
बातमी शेअर करा

 

 

गेवराई दि. २३ ( वार्ताहार ) शहरातील रहिवासी असलेले वकील अॅड. सोपान मडके यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. सदरील बांधकामांचे काम मला का दिले नाही म्हणत मारहाण करून त्याच्या  गळ्यातील सोन्याची चैन पळवल्याची घटना आहे .

 

 

 सविस्तर माहिती अशी कि  गणेश नगर भागातील  रहिवासी असलेले अॅड सोपान मडके यांच्या घराचे बांधकामाचे काम मला का ? दिले नाही म्हणुन  वकीलाच्या घरात घुसून लाकडी दांड्याने मारहाण  केली व  गळ्यातील सोन्याची चैन पळवत ३५ हजाराचा ऐवज लंपास केला असल्याची पोलिसांमध्ये  फिर्याद  अॅड. सोपान मडके यांनी देऊन आरोपी  शेख मोईन शेख राजू व अन्य अनओळखी तिघांविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे.  या प्रकरणी  पुढील तपास पोलीस  करत आहेत .

Advertisement

Advertisement