औरंगाबाद : केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील भाजपची जनआशीर्वाद यात्रा १६ ऑगस्टपासून काढण्यात येणार असून, या यात्रेला माजी मंत्री पंकजा मुंडेंचीही उपस्थिती राहणार आहे. चार दिवसांपूर्वी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे एक बैठक झाली. या बैठकीला औरंगाबादचे स्थानिक पदाधिकारीदेखील गेले होते. त्या बैठकीत जनआशीर्वाद यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यात माजी मंत्री पंकजा यांच्या नाराजीबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी मुंडे यांना संपर्क करून यात्रेच्या आयोजनाची माहिती दिली. मुंडे या गोपीनाथगडावर यात्रेचे स्वागत करणार आहेत.
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याचे बो असा आहे जनआशीर्वाद यात्रेचा मार्ग१६ ऑगस्ट रोजी परळी आणि गोपीनाथगडावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे. यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या उद्देशाने भाजपने नवनिर्वाचित डॉ. कराड यांच्या नेतृत्वात ही जनआशीर्वाद यात्रा काढण्याची तयारी केली आहे. १६ रोजी परळी, गोपीनाथगड, गंगाखेड, पालम, लोहा, नांदेड असा यात्रेचा मार्ग असून, दुसऱ्या दिवशी (१७ जुलै) नांदेड, अर्धापूर, कळमनुरी ते हिंगोली मार्गावरून यात्रा जाईल.
१८ ऑगस्ट रोजी हिंगोली, जिंतूर आणि परभणी या मतदारसंघांतून १९ रोजी परभणी, मानवत, पाथ्री, सेलू, परतूर, वाटूर ते जालन्यापर्यंत यात्रा येईल. २० रोजी जालना ते बदनापूर, शेकटा, करमाड, चिकलठाणा ते औरंगाबाद असा यात्रेचा मार्ग आहे. २१ रोजी औरंगाबाद मार्गे दौलताबाद, खुलताबाद, वेरूळ, हतनूर ते कन्नडपर्यंत यात्रा जाईल, अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आली आहे. लले जात आहे. यातूनच त्यांचे समर्थकदेखील नाराज झाल्याचे बोलले गेले. त्यामुळे डॉ. कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेबाबत मुंडे भगिनी काय भूमिका घेतात, याकडे कार्यकर्त्यांसह सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान, बीडमधील भाजप पदाधिकाऱ्यांना अद्याप यात्रेच्या नियोजनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे समजते.
हेही वाचा...
कोरोना बाधितांचा आकडा लागला घटू
http://prajapatra.com/2886