Advertisement

विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू 

प्रजापत्र | Monday, 09/08/2021
बातमी शेअर करा

 

 

 

किल्लेधारूर दि.९ अॉगस्ट - तालुक्यातील व्हरकटवाडी येथील ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा पिकाला पाणी देत असताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू   झाल्याची घटना सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे. ऐन श्रावण मासारंभ व पहिल्याच सोमवारी  व्हरकटे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
 
धारुर  तालुक्यातील व्हरकटवाडी येथील तरुण शेतकरी कान्हाभाऊ बालासाहेब व्हरकटे (वय ३५) पहाटे आपल्या शेतात सोयाबीन पिकांना पाणी देण्यासाठी गेले. यावेळी मोटार चालू करताना बॉक्समधील विजेचे फ्यूज टाकत असताना विजेचा जबर धक्का  बसला. गावकऱ्यांचा सदरील दुर्घटना लक्षात येताच त्यास उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात  हलवण्यात आले. मात्र तत्पुर्वीच त्याचे निधन झाले.

सदरील मयत तरुणास पाच ते सहा एकर शेती असून सध्या शेतात सोयाबीनसह सिमला मिर्चीचे पिक घेतले आहे. रविवारीच त्यांनी शेतातील सिमला मिर्चीचे पिक काढणी केली होती. याच पिकांना आज पहाटे पाणी देण्यासाठी गेले असता फ्यूज टाकताना विजेचा धक्का बसला. मयत तरुण शेतकरी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अचानक ओढावलेल्या या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

हेही वाचा ... 

 जिल्ह्यात आज केवळ 'इतके'रुग्ण पॉझिटिव्ह
http://prajapatra.com/2855

Advertisement

Advertisement