Advertisement

धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर; प्रचंड नुकसानीसह अनेक गावांचा संपर्क तुटला

प्रजापत्र | Monday, 22/09/2025
बातमी शेअर करा

धाराशिव दि.२२(प्रतिनिधी): जिल्ह्यात पावसाचा कहर थांबायचं नाव घेत आज सोमवार (दि.२२) रोजी सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे मांजरा नदीने आपले पात्र सोडले आहे. त्यामुळे किमान अर्धा किमी दोन्ही बाजूनी नदीचा प्रवाह सुरु झाला आहे.यामुळे वाशी तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला असून आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम सदरील गावात दाखल झाली असल्याची माहिती मिळत आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं कार्य सुरु झालं असल्याचे पारगाव ग्रामपंचायत सदस्य पंकज चव्हाण यांनी सांगितले.

वाशी तालीक्यातील जानकापूर, पांगरी, जेबा या गावांचा संपर्क तुटला आहे कळंब वाशी तालुक्यात एवढा पाऊस झाला की मांजरा नदीने आपले पात्र सोडून वाहू लागली आहे त्यामुळे नदी काठावर असलेल्या गावांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन प्रशासनाने हालचालीना वेग दिला आहे.

Advertisement

Advertisement