Advertisement

अनिल देशमुखांच्या अडचणींमध्ये वाढ 

प्रजापत्र | Friday, 06/08/2021
बातमी शेअर करा

 

 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढत असल्याचे दिसत आहे. यांच्याविरोधात सुरू असलेली ईडीची कारवाई दिवसेंदिवस अधिक वेगाने केली जात आहे. एकीकडे ईडीकडून वारंवार चौकशीसाठी नोटीस बजावल्या जात आहेत. मात्र नोटीसा येऊन देखील अनिल देशमुख उपस्थित राहात नाहीतेय. मात्र दुसरीकडे ईडीने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी सुरूच ठेवली असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

एनआयटी महाविद्यालयावर ईडीचे छापे
आज दुपारी ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपुरातील फेटरी येथील महाविद्यालयावर छापा टाकण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे. यासोबतच, ईडीने नागपुर मधील अनिल देशमुख यांच्याशी संबंधित इतर काही ठिकाणांवर देखील छापे टाकल्याचे वृत्त आहे. सक्त वसुली संचालनालयाने शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयावर छापेमारी केली आहे.

 

 

चौकशीला हजर राहिले आहेत अनिल देशमुख
अनिल देशमुख यांना ईडीनं आतापर्यंत चार वेळा समन्स बजावण्यात आला आहे. मात्र ते अजूनही चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील सोमवारी चौकशीला गैरहजर राहिले. त्यांनी ईडीला पत्र लिहिले होते. यात म्हटले होते की, 'ईडीची माझ्या विरोधातील कारवाई ही कायदा आणि सत्तेचा गैरवापर म्हणून करण्यात आली. मी सुप्रीम कोर्टात यापूर्वीच आव्हान दिले असल्याने चौकशीसाठी हजर राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच सुप्रीम कोर्टात त्यांच्या अर्जावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. 30 जुलैला सुप्रीम कोर्टाने 3 ऑगस्ट ही तारीख देताच ईडीने सोमवारी समन्स जारी केला असे देशमुखांनी पत्रात लिहिले आहे.'

 

 

 

हेही वाचा ... 

 राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या ताफ्यातील तीन गाड्यांना अपघात 
http://prajapatra.com/2837

Advertisement

Advertisement