Advertisement

तरुणाचा चाकूने भोसकून खुन 

प्रजापत्र | Friday, 30/07/2021
बातमी शेअर करा

 

 

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहरातील रेल्वे स्टेशन रोड जवळ असलेल्या बसवेश्वर चौकात एका तरुणास चाकूने भोसकून खून झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी हाती आलेली माहिती अशी की, जगदीश विजय कीवंडे हा सिगारेट ओढत थांबला असता, त्याच्या शेजारीच सोन्या नाटकरी  हा येऊन थांबला. विजय सिगारेट ओढत असताना त्या सिगारेटचा धूर सोन्या नाटकरे याच्या तोंडाकडे जात होता. त्यामुळे नाटकरे यांनी जगदीश यास सिगारेटचा धूर बाजूला सोड, म्हणत असताना दोघांमध्ये तू तू --मै मै झाले. यातून तू माझ्याकडे रागाने का पाहतोस? असे विचारल्यावर त्याला राग आला, त्यातून त्या दोघात मारामाऱ्या झाल्या. दरम्यान सोन्या नाटकरे याने आपल्या कमरेला असलेला चाकू काढून त्याच्या पोटात खुपसला. त्यामुळे जगदिश विजय किवंडे हा गंभीर जखमी झाला, त्यास उपचारासाठी लातूर कडे घेऊन जात असताना रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

 

 

 या प्रकरणी मयताचे नातेवाईक सुनिता विजय किवंडे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सोन्या नाटकरे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २१९/ २१ कलम  ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता पुढे जगदिश मरण पावल्यामुळे यामध्ये कलमात वाढ होऊन कलम ३०२ भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ऐडके यांच्याकडे देण्यात आला आहे. मयत जगदीश  यांच्या मृत्युमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले.  शहरात शांतता राखण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जाॅन बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे आणि त्यांच्या पथकाने चौख बंदोबस्त ठेवल्याने परिस्थिती चिघळली नाही. चौका चौकात पोलिसांनी गस्त चालू ठेवल्यामुळे शहरात तणावपुर्ण शांतता आहे.

Advertisement

Advertisement