Advertisement

वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई

प्रजापत्र | Friday, 16/07/2021
बातमी शेअर करा

मुंबई-भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यानाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे.  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कामगारांची भविष्य निधीची रक्कम जमा न केल्याने, या कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

 

 

औरंगाबादचा भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने वैद्यनाथ कारखान्याचं बँक खातं सील केलं आहे. एवढच नाहीतर त्यातून ९२ लाख रुपये जप्त देखील करण्यात आलेले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने पीएफची रक्कम थकवली होती, त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही रक्कम न भरण्यात आल्याने कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे व त्यातून रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. अशी माहिती औरंगाबाद पीएफ ऑफिसचे क्षेत्रीय आय़ुक्त जगदीश तांबे  यांच्याशी बोलताना एबीपी माझाशी दिली आहे.
कारखान्याने २०१८ ते ऑगस्ट २०१९ कालावधीत पीएफची रक्कम भरणा केली नव्हती. पीएफपोटी थकीत रक्कम १ कोटी ४६ लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली, उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

 

Advertisement

Advertisement