Advertisement

प्रत्येक शिपाई निवृत्तीपर्यंत पीएसआय होणारच? 

प्रजापत्र | Friday, 02/07/2021
बातमी शेअर करा

 

 

  पुणे- 'पोलिस दलात शिपाई म्हणून दाखल झालेल्या शिपायाला पीएसआयपर्यंत पदोन्नती मिळविण्यासाठी फार काळ प्रतीक्षा करावी लागते. काही जण त्यापूर्वीच निवृत्त होतात. मात्र, पोलिस दलात दाखल झालेला प्रत्येक शिपाई पीएसआय म्हणून निवृत्त होईल, अशी योजना आखली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर फार आर्थिक भार वाढणार नाही. त्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे,' अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील  यांनी दिली. दरम्यान, 'या प्रस्तावाबाबत एकत्र बसून निश्चीत चर्चा करू', असे अजित पवार यांनी वळसे पाटील यांना सांगितले.

 

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्यावतीने कल्याण शाखेमार्फत पोलिस मुख्यालय पुणे ग्रामीणच्या आवारात उभारण्यात आलेल्या पाषाण रस्ता आणि बाणेर रस्ता या दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

 

खंडणी लाचखोरीला बळी पडू नका

'पोलिसांनी सामाजिक जीवनात वावरताना कोणत्याही पद्धतीची चुकीची घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. चुकीच्या कृत्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची बदनामी होते. खंडणी, लाचखोरी अशा अमिषाला बळी पडू नका,' असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना केले. पुणे ग्रामीण पोलिस दलाच्यावतीने कल्याण शाखेमार्फत पोलिस मुख्यालय पुणे ग्रामीणच्या आवारात उभारण्यात आलेल्या पाषाण रस्ता आणि बाणेर रस्ता या दोन पेट्रोल पंपाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अनुकंपा तत्वावर पोलिस दलात नियुक्त

 

 

Advertisement

Advertisement