Advertisement

 पंधरा जूलैपर्यंत दहावीचा आणि बारावीचा निकाल

प्रजापत्र | Wednesday, 30/06/2021
बातमी शेअर करा

 

 मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा दहावी  आणि बारावीचा निकाल पंधरा जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल. दहावीचा निकाल ९ वी आणि १० वीच्या (अंतर्गत गुण) घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थ्याने आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच सांगितलंय. 

 

 

बारावीच्या निकालाचे मूल्यांकन धोरण लवकरच ठरणार
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल २०२१(एचएससी निकाल २०२१ ) निकाल ३१जुलै पर्यंत जाहीर करण्यात येईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानुसार, यावर्षी राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केलं जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील.तसंच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

 

Advertisement

Advertisement