Advertisement

रुग्णांसाठी बेड शोधायचाय ? मग वापरा ही लिंक

प्रजापत्र | Tuesday, 20/04/2021
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळविणे जिकरीचे होऊ लागले आहे. अशावेळी आपल्या जवळच्या कोणत्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे हे कळण्यासाठी म्हणून आरोग्य विभागाने एक संकेतस्थळ उपलब्ध केले आहे . त्यावर आपल्या गावाचा पिन कोड टाकून जवळ्याची रुग्णालयातील खाटांची परिस्थिती माहिती करून घेता येणार आहे. 
बीडच्या आरोग्य विभागाने कोविडबीड या नावाने हे संकेत स्थळ सुरु केले आहे. यात जवळच्या रुग्णालयातील ऑक्सिजनसह , ऑक्सिजन विरहित, आयसीयू , व्हेंटिलेटर आदींच्या उपलब्ध खाटांची माहिती दिली जात आहे. यावरील माहिती प्रत्येक तासाला अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिल्या आहेत. या सुविधेचा रुग्णानानी लाभ घ्यावा असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी म्हटले आहे. 

पोर्टलचा वापर करण्यासाठी 

https ://covidbeed.com  

वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement