बीड: नुकतीच निवडणूक झालेल्या परंतु कोरम अभावी नविन संचालक मंडळ स्थापित होऊ न शकलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली आहे. प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या सोबत प्रशासक मंडळात शिखर बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, सनदी लेखापाल जनार्दन रणदिवे ,सहाय्यक निबंधक अशोक कदम आणि ऍड अशोक कवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागील महिन्यात झालेल्या निवडणूकित १९ पैकी ११ जागा रिक्त राहिल्या असुन उर्वरित ८ पैकी ५ जागा राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पँनल, १ जागा अपक्ष (राजकिशोर मोदी) तर प्रत्येकी १ जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आ. सुरेश धस समर्थकांना मिळाली. मात्र कोरम पुर्ण होत नसल्याने हे संचालक मंडळ स्थापित करता येत नसल्याचे सहकार प्राधिकरणाने राज्य सरकारला कळविले होते.
त्यांमुळे आता बँकेवर ५ सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.या मंडळाच्या अध्यक्षपदी अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली