बीड दि.२२-गेवराई शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना कृषी पर्यवेक्षकास रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) सायंकाळाच्या सुमारास करण्यात आली.
संदीप सुभाष देशमुख (कृषि पर्यवेक्षक) लाच स्विकारणार्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडे देशमुख याने शेततलावाच्या अस्तरीकरणाचे बील काढण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्विकारतांना गेवराई येथील कृषी कार्यालयात देशमुख यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, बीड पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, श्रीराम गिराम, गारदे यांनी केली. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.