Advertisement

बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन

प्रजापत्र | Saturday, 10/01/2026
बातमी शेअर करा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेची हॉल तिकीट सोमवारी पासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

विद्यार्थी मंडळाच्या अधिकृ त संकेतस्थळावर www.mahahsscboard.in किंवा http://www.mahahsscboard.in प्रवेश करून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध असतील.विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र प्रिंट करून घ्यावे आणि त्यावर शाळेतील मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी संबंधित शाळा किंवा महाविद्यालयांची असेल. जर प्रवेशपत्रावरील नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा इतर माहिती चुकीची असेल तर विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने फी भरून दुरुस्ती अर्ज सादर करू शकतात. यामुळे परीक्षा केंद्रावर अडचण टाळता येईल.

Advertisement

Advertisement