ठाणे : बदलापूरमधील (Badlapur) बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे (BJP) स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला.

विशेष म्हणजे, कालच कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या कार्यकारणी बैठकीत आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, समाजातून तीव्र प्रतिक्रिया येत होत्या, तर भाजपने तुषार आपटे याच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा तातडीने राजीनामा घेतला नाही तर येत्या 13 किंवा 14 जानेवारीला मनसे (MNS) बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. वाढता विरोध लक्षात घेत तुषार आपटेंनी आपला राजीनामा दिला आहे.
बातमी शेअर करा

