Advertisement

सख्ख्या भावांनी पाण्यासाठी उपसल्या कुऱ्हाडी

प्रजापत्र | Friday, 19/12/2025
बातमी शेअर करा

 केज दि.१९ (प्रतिनिधी):तालुक्यातील (Kaij) येवता येथे विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्या भावांनी एकमेकांविरुद्ध कुऱ्हाड, कत्ती आणि काठ्यांचा वापर केल्याने दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी केज पोलिसांनी (Crime) दोन्ही बाजूंच्या एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

     केज (Kaij)तालुक्यातील येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते (५३) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते आणि त्याच्या मुलांनी तेथे येऊन वाद घातला. "विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस," असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. "आपण बारीने पाणी घेऊ" असे मल्हारी यांनी सुचवले असता, रागाच्या भरात (Crime)अशोकने कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात चुलते मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार(Police) करून त्याला जखमी केले, तर इतरांनी दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून मल्हारी सक्राते यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement