बीड- बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा झालेले राज्याचे क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट जाहीर केल्यानंतर कोकाटे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत असताना माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.या भेटीमागे अनेक चर्चाना पेव फुटले असताना अखेर धनंजय मुंडे यांनी यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
मुंडे म्हणाले आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत भेट घेऊन विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती असे त्यांनी सांगितले असून सध्या मुंडेंच्या भेटीमागे मंत्रिपदाच्या चर्चाना मात्र मोठे पेव फुटले आहे.

बातमी शेअर करा
