Advertisement

क्लास सुरू असताना शिक्षकासमोरच मुलांमध्ये गँगवार

प्रजापत्र | Monday, 15/12/2025
बातमी शेअर करा

पुणे : राजगुरुनगर येथे भल्या सकाळी खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार (Crime News) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्लासमध्येच मुलांवर चाकु हल्ला करण्यात आला आहे. क्लासमेट असलेल्या मुलानेच हा हल्ला केला आहे. शिक्षक शिकवत असतानाच क्लासमध्ये मुलाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरुन फरार झाला, या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.  

       या हल्ल्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हल्ला झालेल्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.मात्र, उपचारादरम्यान हल्ला झालेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, आता खाजगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 13 ते 14 वर्ष वयोगटातील ही मुलं आहेत. 8 वी आणि 9 वी वर्गातील मुलांचा क्लास एकाचवेळी सुरु होता. त्यावेळी ही घटना घडली आहे. ( Crime News) खेड राजगुरूनगर मधील हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. मयत मुलगा आणि हल्ला करणारा मुलगा दोघे ही दहावीत शिक्षण घेणारे मित्र होते. आज दोघे ही शिकवणीच्या वर्गात उपस्थित होते, त्यावेळी मित्राने मित्राच्या गळ्यावर वार केले. ज्यात 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. हल्ला करणाऱ्याचा शोध सुरु आहे.

Advertisement

Advertisement