Advertisement

दुचाकीस्वाराला चौघांनी लुटले

प्रजापत्र | Sunday, 07/12/2025
बातमी शेअर करा

परळी दि.७(प्रतिनिधी):तालुक्यातील धारावतीतांडा शिवारात एका २६ वर्षीय युवकास दुचाकी आडवी लावून चौघांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील सोन्याच्या दागिन्यांसह एकूण २,२०,००० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.५) रोजी घडली असून चार जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
    यशवंत प्रेमदास चव्हाण (वय २६) रा.धारावती तांडा ता.परळी जि.बीड,हा तरुण ग्राहक सेवा केंद्र चालवतो तो दुचाकीवरून गावाकडे जात असताना धारावतीतांडा शिवारात परळी ते धर्मापुरी रोडवर अज्ञात चौघे पाठीमागून दुचाकीवर आले व त्यांनी यशवंत पवार यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ते खाली कोसळताच चाकूचा धाक दाखवत,डोळ्यात चटणी टाकून त्याच्याकडील साडेतीन तोळ्याची गळ्यातील चैन १,४०,००० रुपये ,दोन तोळ्याची अंगठी ८०,००० रुपये,एकूण २,२०,००० हजारांचा ऐवज बळजबरीने लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.५) रोजी सायंकाळी ०७:३० च्या सुमारास घडली असून चार जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक निमोने हे करीत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.   

Advertisement

Advertisement