Advertisement

चालत्या बसमध्ये आला प्रवाशाला हृदयविकाराचा झटका

प्रजापत्र | Monday, 01/12/2025
बातमी शेअर करा

बीड  दि.१ (प्रतिनिधी): हिवरापाडी येथून बीडकडे येत असलेल्या एस.टी. बसमध्ये प्रवास करत असताना एका वृद्ध प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. हा प्रकार लक्षात येताच चालक व वाहक यांनी सतर्कता दाखवून बस जिल्हा रुग्णालयात आणल्याणे वेळेत उपचार मिळून प्रवाशाचा जीव वाचला. ही घटना आज सोमवारी (दि.१) सकाळी घडली.असून चालक-वाहकाच्या तत्परतेने वाचला प्रवाशाचा जीव. 

      सुंदर दादाराव गायके (वय ७२ वर्ष ) रा. हिवरापडी ता. जिल्हा बीड हे बसने प्रवास करत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. हा प्रकार लक्षात येताच परिस्थितीची गंभीरता ओळखून चालकाने तत्काळ बस सरळ बीडच्या शासकीय रुग्णालयात प्रवाशाला उपचारासादी दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते, चालक व वाहक यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Advertisement

Advertisement