बीड दि.२६ (प्रतिनिधी)-स्पाच्या नावाखाली थेट वेश्या व्यवसायासारखे रॅकेट पोलिसांच्या नाकावर टिच्चून बीडमध्ये काही दिवसांपासून सुरु झाले आहे.'मॅजिक मोमेंट'चे नाव देत काळे'गोरे' धंदे करणाऱ्यांना पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे अभय मिळत असल्याचे सांगितले जाते.

बीडमध्ये घर असेल किंवा हॉटेल अगदी अज्ञात स्थळीही स्पाच्या नावाखाली होम सर्व्हिसचे कारण पुढे करत मुली पुरविण्याचा गोऱ्या चेहऱ्याचा काळा धंदा केला जात आहे. हा चालावा यासाठी पोलिसांवर कोणती 'मॅजिक' केली जाते आणि कोणाच्या 'मोमेम्ट' कोठे होतात हे मात्र मोठे कोडे आहे.
पोलिसांना गल्लीबोळातील अवैध धंदे दिसतात,धाब्यावरची दारू सापडते.हवाला रॅकेट घरातून शोधून काढले जाते.शेतात पिकांच्या आड घेतलेला गांजा मिळतो,अगदी काही दिवसांपूर्वी बीडमध्ये पहिल्यांदाच व्हेल माशाची तस्करी केलेली उलटी देखील पोलिसांना मिळाली.अहो हे सर्वच कौतुकास्पद आहे पण राजरोजपणे अन खुलेआम भरणारा अन जाहिरातबाजीतून शहारत सर्वत्र अश्लीलतेचे प्रदर्शन करणारा मॅजिक मोमेंटचा स्पा मात्र खाकीच्या नजरेतून सुटतो हे नवल वाटण्यासारखंय.बीडमध्ये काही दिवसांपूर्वी याच काळे'गोरे' धंदा करणाऱ्यांना पंकज कुमावत यांनी धडा शिकवला होता.त्यावेळी केलेल्या कारवाईची देखील मोठी चर्चा झाली म्हणे.पण यातील मुख्य मासा पोलिसांच्या गळाला लागला नाही.आता त्यामुळेच असेल कदाचित अश्लीलतेचे धंदे करण्याचे त्याचे धारिष्टय वाढले अन पोलिसांच्या नाकावर टिच्चून 'मॅजिक'च्या नावाखाली बीडमध्ये वेश्या व्यवसायासारखे रॅकेट सुरु झाल्याच्या चर्चा यामुळे रंगल्या आहेत.

