Advertisement

जयदत्त क्षीरसागरांची एंट्री बीडमध्ये भाजपसाठी बूस्टर     

प्रजापत्र | Wednesday, 26/11/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. २५ (प्रतिनिधी ) : बीड शहराच्या राजकारणात 'भाजपमध्ये प्रवेश नाही, मात्र शहराच्या भवितव्यासाठी नगरपालिकेत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा ' अशी भूमिका घेत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सोमवारी सक्रिय झाले. मागच्या अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागरांच्या भूमिकेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या समर्थकांना यातून एक दिशा मिळाली असून जयदत्त क्षीरसागरांची भूमिका बीड नगरपालिकेत भाजपसाठी बूस्टर ठरणार आहे.
       मागच्या काही काळापासून बीडमध्ये माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्यातच राष्ट्रवादीमध्ये झालेल्या काही घडामोडींममुळे डॉ. योगेश क्षीरसागर थेट भाजपात गेले, त्यानंतर तर आता जयदत्त क्षीरसागरांची भूमिका काय असेल, ते नेमके काय करणार याची उत्सुकता सर्वांना होती. त्यांचे समर्थक तर नेमके काय करायचे यासाठी त्यांच्या भूमिकेकडे पाहत होतेच, त्यासोबतच शहरातील व्यापारी, डॉक्टर्स आणि इतर वर्ग देखील जयदत्त क्षीरसागर काय सांगणार याची वाट पाहत होते . या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी जयदत्त क्षीरसागरानी पेठबीड भागात भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. यात मी कोणत्याच पक्षात नाही, पण शहराच्या विकासासाठी, भवितव्यासाठी म्हणून आपण भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासोबत आलो आहोत, भाजप उमेद्वारांसोबत आलो आहोत ' असे शीफ़्ट केले, तसेच भाजपला निवडणून देण्याचे आवाहन केले. जयदत्त क्षीरसागर यांची हि भूमिका बीड शहरात भाजपसाठी मोठा बूस्टर डोस ठरणार आहे. शहरातला विविध जाती समूहांमधला मोठा वर्ग मागच्या काळात द्विधा मनस्थितीत होता, क्षीरसागरांच्या भूमिका पूर्वी दोन झाल्या, आता काय होणार ? आपण नेमके काय करायचे हा संभ्रम अनेकांच्या मनात होता. आता जयदत्त क्षीरसागरानी त्याला पूर्णविराम देत नगरपालिकेत भाजपच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतल्याने हा संभ्रमातला मोठा मतदार भाजपकडे वळणार असून त्यामुळे शहरात भाजपची शक्ती वाढणार आहे.

Advertisement

Advertisement