प्रविण पोकळे
आष्टी- तालुक्यातील बावी दरेवाडी येथे रविवारी (दि. १२)
रात्री ९ वाजता शेतात गेलेल्या तरुणावर हल्ला करून बिबट्याने प्राण घेतल्याची घटना समोर येतं आहे. याप्रकारमुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
राजू विश्वनाथ गोल्हार (वय ३५) हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते परत न आल्याने कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली.शोध घेत असताना त्यांच्या टॉवेलवर रक्ताचे डाग तसेच शेत परिसरात रक्ताचे चिन्ह आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही वेळानंतर शोध घेता घेता राजू गोल्हार यांचा मृतदेह सापडला.
प्राथमिक अंदाजानुसार हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस व वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे बावी व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा