परळी दि.१९ (प्रतिनिधी): शहरातील माणिक नगर येथील एकाच्या घरात लॉक बदलण्यासाठी आलेल्या चावीवाल्याने दिवसाढवळ्या कपाटातील १० लाख ४४ हजारांच्या सोन्यावर डल्ला मारला आहे. या प्रकरणातील आरोपीला परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवार (दि.१८) रोजी घडली आहे.
परळी शहरातील माणिक नगर भागात राहणाऱ्या पांडुरंग प्रभाकर लोखंडे यांच्या घरातील लॉक बदलण्यासाठी परळीतील बबलू चावीवाला याला घेऊन आले होते. तर घरातील कपाटाचे लॉक बदलताना बबलूने मारतुल आणून देण्यासाठी सांगितल्याने घर मालक याची नजर चुकून कपाटातील ८ तोळे ७ ग्राम वजनाचे १० लाख ४४ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शनिवार (दि. १८) ऑक्टोबर रोजी पांडुरंग प्रभाकर लोखंडे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आणि त्यानंतर काही तासांत पोलिसांनी आरोपी बबलू चावीवाला याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री.नाचण,पीएसआय राठोड, एएसआय दराडे, रेडेवाड यांनी केली आहे.

बातमी शेअर करा