Advertisement

वडवणीत डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 07/09/2025
बातमी शेअर करा

वडवणी दि.७(प्रतिनिधी): शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम यादव यांचा मृतदेह गणेश विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळून आला.असून हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत विविध चर्चांना ऊत आला आहे.

      मुळचे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील असलेले डॉ.शुभम बालाजीनाथ यादव हे १० ऑक्टोबर २०२४ पासून वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून ते बेपत्ता असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना कळवले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह वडवणी शहरातील तलावात आढळला.अलिकडेच वडवणी येथे एका सहाय्यक सरकारी वकिलाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. यादव यांचा मृत्यू आत्महत्या आहे की कोणीतरी त्यांना तलावात ढकलून दिले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.पोलीसांनी मृतदेहाची तपासणी व शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून अहवाल आल्यानंतरच मृत्युचे कारण स्पष्ट होईल या घटनेचा पुढील तपास वडवणी पोलीस करीत आहेत.

Advertisement

Advertisement