Advertisement

दहा वर्षीय मुलगी गेली वाहून 

प्रजापत्र | Tuesday, 29/04/2025
बातमी शेअर करा

परळी दि.२९ (प्रतिनिधी):परळी जवळील (Parli Vaijnath) नवीन औष्णिक विद्युत केंद्र परिसरात असलेल्या लोणी तांडा येथे उन्हाळी सुट्ट्यात नातेवाईकांकडे आलेली १० वर्षीय मुलगी जवळच असलेल्या कॅनलच्या पाण्यात कपडे धूत असताना वाहून गेल्याची घटना काल (दि. २८) रोजी घडली असून नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन विभागाने तब्बल १२ तास या मुलीचा शोध घेतला. परंतु आज (दि.२९ ) मंगळवार रोजी सकाळी उक्कडगाव ता. सोनपेठ जिल्हा परभणी जवळील कॅनाॅलमध्ये (Parli Vaijnath) या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. 

                   सध्या जायकवाडी धरणातून कॅनॉलमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे. या कॅनॉलला आलेल्या पाण्यामध्ये कपडे धुत असलेली शाळकरी मुलगी वाहून गेल्याची घटना (दि.२८) सोमवार रोजी घडली. परळी नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुनील आदोडे,नितीन जगतकर निखील वाघमारे, निखील गोदाम, वाहनचालक विठ्ठल गित्ते आदींनी अथक प्रयत्न करून शोधमोहीम सुरु केली होती.काल रात्री उशिरा पर्यंतही या मुलीचा (Girl)शोध लागला नाही. आज सकाळ पासूनच पुन्हा नगरपरिषदेच्या (Parli Vaijnath) आपत्ती व्यवस्थापन विभागाने शोध मोहीम सुरू केली असता उक्कडगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी जवळील कॅनॉलमध्ये या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे मयत मुलगी ही पुणे येथील शाळेत शिकायला होती.उन्हाळी सुट्टीत ती परळीला नातेवाईकांकडे  आली होती. शिवकन्या अजय चव्हाण ( वय १०) असे मयत मुलीचे नाव आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.(Parli Vaijnath) दरम्यान या शाळकरी मुलीच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Advertisement

Advertisement