Advertisement

हिवरसिंग्यात गुटख्यावर धाड 

प्रजापत्र | Saturday, 08/03/2025
बातमी शेअर करा

शिरूरकासार  दि.८(प्रतिनिधी): तालुक्यातील(Shirur) हिवरसिंगा येथे गुटख्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (Beed police)धाड मारत (दि.७) रोजी रात्री १०:३० च्या दरम्यान कारवाई केली या कारवाईत १४,५०,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असून (Crime)या संदर्भात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बीड जिल्ह्यातली (Beed)गुन्हेगारी आणि अवैध धंद्याची चर्चा संपूर्ण राज्यभरात झाली होती .यामुळे जिल्ह्यातील कायदा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले होते .यानंतर मात्र जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध धंदे आणि गुन्हेगारी विरोधात ठोस पावले उचलत कारवाईचा दणका दिला.जिल्ह्यातील अवैध दारू,वाळू ,मटका,गुटखा अशा धंद्यावर कारवाईचा सपाटा लावला स्थानिक गुन्हे शाखेने (Shirur kasar)शिरूरकासार तालुकयातील हिवरसिंगा येथे (दि.७) रोजी रात्री १०:३० च्या दरम्यान झापा टाकला यात बंडु निवृत्ती जाधव (रा.हिवरसिंगा गायकवाड वस्ती) याच्या घरात हिरा,पान मसाला असा १४,५०,३२० रुपयांचा गुटखा (Crime news)आढळून आला हा गुटखा जप्त करत त्याच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात या कलमांतर्गत १२३,२२३,२७४,२७५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Beed Police) सदरची कारवाई नवनीत कावत पोलीस अधीक्षक बीड,सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक बीड,उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पो.हवा.अशोक दुबाले, दीपक खांडेकर, सोमनाथ गायकवाड , बाळू सानप, अर्जुन यादव, नारायण कोरडे, सिद्धेश्वर मांजरे,श्री.राऊत यांनी केली.अधिक तपास शिरूर पोलीस करत आहेत.  
 

 

 

 

 

 

 

Advertisement

Advertisement