माजलगाव दि.१ (प्रतिनिधी): रोटरी क्लब ऑफ(Rotary club magalgaon) माजलगाव सिटीच्या वतीने तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिक्षा रविवार (दि.२) मार्च रोजी यशवंत विद्यालय (magalgaon) माजलगाव येथे होणार आहे.
विद्यार्थ्यांमधील प्रज्ञेचा शोध घेऊन त्यांना स्पर्धा (Exam)परीक्षेस बसण्याचा आणि त्यात यश मिळवण्याचा आत्मविश्वास लहान वयातच निर्माण करून देणे हा या परीक्षेचा उद्देश आहे. या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित ही परिक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ माजलगाव (Rotary club magalgaon)सिटीचे अध्यक्ष रविंद्र कानडे,सचिव लता जोशी,प्रोजेक्ट चेअरमन निरंजन वाघमारे केले आहे.

प्रजापत्र | Saturday, 01/03/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा