Advertisement

मढीच्या यात्रेवर वादाचं सावट?

प्रजापत्र | Friday, 28/02/2025
बातमी शेअर करा

अहिल्यानगर: पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील (Madhi Kanifnath Yatra)ग्रामसभेत कानिफनाथ देवस्थानच्या यात्रेत एकही मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना दुकान लावण्यात बंदी घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. या निर्णयानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. मढीतील मुस्लिम व्यावसायिकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून मढीतील यात्रा ही शांततेत पार पाडावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, शनिवारी राज्याचे मंत्री नितेश राणे( Nitesh Rane)या ठिकाणी भेट देणार आहेत. 

Advertisement

Advertisement