Advertisement

दत्तात्रय गाडे मध्यरात्री पाणी मागण्यासाठी आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

प्रजापत्र | Friday, 28/02/2025
बातमी शेअर करा

पुणे : स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर (Pune crime)बलात्कार करून फरार झालेला नराधाम दत्तात्रय गाडे हा त्याच्या गुनाट गावामध्ये भुकेलेला तहानलेल्या अवस्थेत अखेर पोलिसांच्या ताब्यात आला.गेल्या दोन दिवसांपासून शिरूर तालुक्यातील आपले मूळ गाव असलेल्या गुनाट येथील उसाच्या pune news)फडांमध्ये लपलेला गाडे अखेर भुकेने आणि तहानेने व्याकुळ झाल्यानंतर बाहेर पडला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला अशा पद्धतीने मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली

 

गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहीम रात्रभर सुरूच ठेवलेले होती मध्य (Pune police)रात्री तो गावातील एका घरामध्ये येऊन पाण्याची बाटली घेऊन गेला होता त्यावेळी तो फार घाबरलेला होता, त्या घरातील लोकांनी त्याला तू पोलिसांना शरण जा असे सुचवले होते त्यावेळी तो पण म्हणाला  मी पोलिसांना शरण जाणार आहे असे सांगत होता पण नंतर तेथून निघून गेला.

भुकेने तो अर्धमेला झाला होता, मग ही माहिती त्या घरातील लोकांनी पोलिसांना दिली ती माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने पुन्हा त्याचा शोध सुरू केला त्यावेळी गावकरीही पोलिसांच्या मदतीला होते. अखेर या शोधमोहिमेला यश आले.

पोलिसांच्या एवढ्या मोठ्या पोलीस pune bus crime news)फाट्याचा त्याने अवमान करू नये अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते त्याचे नातेवाईक, गावकरी आणि परिचितांकडूनही अनाउन्समेंट केली जात होती की तू लवकरात लवकर पोलिसांना शरण ये असे पळण्यात काहीही अर्थ नाही असे आवाहन करण्यात येत होते.

गुनाटगावच्या पोलीस पाटलांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केलं होतं त्यानुसार तो बाहेर आल्यानंतर त्याने पोलीस पाटलांना फोन लावा असं त्या व्यक्तीला सांगितलं. तो दोन दिवस उपाशीच होता त्याला पाण्याची आणि अन्नाची फार गरज होती त्यामुळे ते मागण्या साठीबाहेर आला आणि पोलीसांच्या जाळ्यात अडकला.

Advertisement

Advertisement