Advertisement

वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

प्रजापत्र | Thursday, 27/02/2025
बातमी शेअर करा

परळी दि.२७ (प्रतिनिधी):शहरातील जे.के.फॅशन हॉल समोर परळी वै ते मल्लापूर कडे जाणाऱ्या रोडवर विनापरवाना ट्रॅक्टरच्या सहाय्याने (Sand smuggling)अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच (Parli police )परळी ग्रामीण पोलिसांनी (दि.२६) बुधवार रोजी कारवाई करत पाच लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून (Beed)जिल्हाभरात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहरातील जे.के. फॅशन हॉल समोर परळी वै ते मल्लापूर कडे जाणाऱ्या रोडवर विनापरवाना ट्रॅक्टरच्या सहाय्याने (Sand smuggling)अवैध वाळू वाहतूक करताना बळीराम काशिनाथ सानप रा.वैजवाडी ता.परळी व बिबन बाबू सय्यद रा.मांडवा ता.परळी यांच्यावर परळी ग्रामीण पोलिसांनी (दि.२६) बुधवार रोजी कारवाई केली. यात महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम एच ३८ बी ५७३९ किंमत ४,००,००० व एक ट्राली तिची किंमत २५००० तसेच एक ब्रास वाळू किंमत १५०o० रु असा एकूण ५,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement