Advertisement

 मंत्री धनंजय मुंडेंवर पक्षाची नवी जबाबदारी

प्रजापत्र | Friday, 14/02/2025
बातमी शेअर करा

मुंबई दि.१४ (प्रतिनिधी): आगामी होऊ घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने (Ajit Pawar)अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाची संघटन बांधणी, धोरणात्मक निर्णय, जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. या कोअर ग्रुपमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री(Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांना स्थान देत पक्षाने ना. मुंडेंवर एक मोठी जबाबदारी दिली आहे.

   विधानसभेच्या निवडणुकीत चांगले यश प्राप्त झाल्यानंतर(Nationalist Congress Party)राष्ट्रवादी काँग्रेस आता राज्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत करत आहे. त्याअनुषंगाने पक्षाची संघटनात्मक बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणीसाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. हा ग्रुप आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमापासून पक्षासंदर्भातील महत्वाच्या धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करणार आहे. या कोअर ग्रुपमध्ये उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष (Sunil Tatkare)सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ना. मुंडेंवर मोठी जबाबदारी दिली आहे.

 

Advertisement

Advertisement